fbpx

चाळीसगावच्या सोलर पीडित शेतकऱ्यांचे आजपासून आझाद मैदानावर धरणे

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख ।  गौताळा अभयारण्यातील फर्मी सोलर फार्मस प्रा. लि. व जे.बी.एम. सोलर प्रा. लि.यांच्या बेकायदा सोलर प्रकल्पाची शासन नियुक्त एसआयटी मार्फत चौकशी करून या प्रकल्पामुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समिती व मोजके पीडित शेतकरी आजपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करीत आहे.

या आंदोलनाची शासनाने दोन दिवसात दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशीचा आदेश न काढल्यास ते 25 सप्टेंबर पासून पीडित शेतकरी प्रकल्पस्थळी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने भीमराव जाधव यांनी सांगितले आहे.

mi advt

कृती समितीच्या वतीने 16 सप्टेंबरला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी देखील एसआयटीच्या चौकशीबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल असे आश्वासन दिले आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी बचाव कृती समिती कायदेशीर मार्गाने लढा देत असतानाही त्यांच्या लढ्याकडे राजकीय दबावाखाली दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज