fbpx

गॅस व इंधन दरवाढविरोधात मेहरुण परिसरातील युवक व महिलांचे आंदोलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । केंद्र सरकारच्या गॅस व इंधन दरवाढविरोधात मेहरुण परिसरात शेरा चौक परिसरातील युवक व महिलांनी आंदोलन पुकारले व केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी नागरिक संतप्त दिसण्यात आले व नागरिकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मेहरूण परिसरातले युवक आकिफ पटेल यांनी समाजमाध्यामांशी बोलतांना केंद्र सरकारच्या गॅस व इंधन दरवाढ विरोधात व देशाची अर्थव्यवस्था बिघाडल्याबद्दल जोरदार टीका केली. भाजप सरकार ने युवकांचे अनेक प्रश्न सोडवले नाही.

महाराष्ट्रात भाजप सरकारची लायकी काय आहे हे शरद पवार साहेबांनी दाखवून दिली व पुढच्या लोकसभा निवडणुकीत युवक वर्ग हा भाजपला पाडणार असाही जोरदार टोला त्यांनी केंद्र सरकारला लावला. 

यावेळी युवा काँग्रेसचे जिल्हा महासचिव अनिशा बी हेही तिथे उपस्थित होते. त्यांनीही केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज