fbpx

मोटर सायकल चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बुधवार दि. २२ रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शहरातील तानाजी मालुसरे नगरातील एका १९ वर्षीय युवकास अटक केली. त्यास चोरीच्या दुचाकीसह शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने मोटर सायकल चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आले होते. त्यानुसार तपास सुरु असतांना शहरातील तानाजी मालुसरे नगरातील एक युवक आपल्या अल्पवयीन साथीदारासह दुचाकी लंपास करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार स्थागुशाच्या पथकाने बुधवार दि. २२ रोजी सागर विलास सपकाळे (वय १९, रा. तानाजी मालुसरे नगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची काळया लाल रंगाची होंडा पॅशन कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली असून त्यास चोरीच्या दुचाकीसह शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

mi advt

यांच्या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोहेकॉ. जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, पोना. नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज