धक्कादायक : नवजात चिमुकल्याला नाल्यात फेकून मातेचे पलायन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी शिवारात झटका वस्ती बेलदारवाडी च्या परिसरामधील नाल्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून पलायन केल्याची घटना दिनांक १३ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला क्रूर माता व अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही खबर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व ते अर्भक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

एक पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर पडले असल्याची माहिती सोमनाथ कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. ही माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी कायदेशीर कारवाई करून त्या पुरुष जातीच्या अर्भकाला 108 अंबुलन्स च्या साह्याने औषधोपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून त्याचे प्राण वाचवले.

तसेच नवजात अर्भकास गरम कपडे, दूध आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या. या अर्भकावर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे.

दरम्यान, नवजात अर्भक नाल्यात फेकून देणाऱ्या अज्ञात मातापिता विरोधात पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -