राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय ; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ ।  राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळं ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान परत एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, संपूर्ण राज्यात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

३ सप्टेंबर रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल.

दरम्यान, देशात सप्टेंबरमध्ये या महिन्याच्या सरासरीच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या हंगामातील एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा नऊ टक्के कमी आहे. सप्टेंबरमध्ये ही तूट काही प्रमाणात भरून निघेल, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -