fbpx

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । केरळात निर्धारित वेळेच्या दोन दिवस उशिराने म्हणजे ३ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने आगेकूच करत दोन दिवस आधीच महाराष्ट्रात एन्ट्री केली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

रत्नागिरीच्या हर्णे येथे आज शनिवारी मान्सून दाखल झाला आहे. येथून पुढे राज्यात प्रवास सुरु होईल. पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार आहे. राज्यातील हवामानाची परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. हर्णेपर्यंत पोहचलेला मान्सून नंतर द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भागात पोहचून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

यंदा मान्सून निर्धारित वेळेच्या तीन दिवस उशिराने म्हणजेच ३ जूनला दाखल झाला. त्यांनतर मान्सून पुढे आगेकूच होत तो केरळनंतर कर्नाटक किनारपट्टीवर कारवारपर्यंत मान्सून पोहोचला होता. त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला आहे.

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज