fbpx

शहरात जबरी पैसे हिसकावणाऱ्या टोळीचा मोरक्या गजाआड; शहर पोलीस पथकाची कामगीरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ ।  जळगाव शहरात विविध भागात जबरी पैसे हिसकावून टोळीचा मोरक्या रईस खान हनीफ खान ऊर्फ रईस लाला (वय २७) रा. मास्टर कॉलनी याला शहर पोलिसांनी आज २३ मार्च रोजी गेंदालाल मिल परिसरातून पाठलाग करून अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात पायी रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातुन पैसे व मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या गुन्ह्यात अधिक वाढ झाली आहे. या गुन्ह्याचा शोध घेण्याकामी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी डीबी पथकाचे एक पथक तयार करून पैसे व मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले. सदर पथकातील पो ना. अक्रम शेख व पो ना. भास्कर ठाकरे यांना  गुप्त माहिती मिळाली की जबरीने पैसे व मोबाईल हिसकावणारा आरोपी गेंदालाल मिल भागात आहे.

शहर पोलीसांच्या पथकातील पो ना. अक्रम शेख, पो ना. भास्कर ठाकरे, पो ना. प्रफुल्ल धांडे, पो कॉ. रतन गिते व विजय निकुंभ यांनी गेंदालाल मिल परिसरात आज 23 मार्च रोजी सापळा रचून संशयित आरोपी रईस खान उर्फ रईस लाला याचा पाठलाग करून  अटक केली आहे. संशयित आरोपीने शहरात गेल्या काही दिवसंपासून जबरी पैसे व  मोबाइल हिसकावून गुन्ह्यांची कबुली दिली आहे. संशयित आरोपी हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता त्याच्याकडून शहरातील जबरी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt