fbpx

पद्मालय देवस्थान जातायं… मग वाचा विश्वस्त मंडळाची सूचना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथील दर श्रावण सोमवारनिमित्त भरणारी यात्रा व यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला असल्याचे श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने कळ‌वले आहे.

कोविड १९ संदर्भात जिल्हा प्रशासनाने नियम शिथील केले असले तरी गर्दीमुळे महामारीचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर खबरदारी म्हणून श्रावण सोमवारचा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे.

भाविकांनी गर्दी करू नये. गणरायाचे घरीच चिंतन, स्मरण करावे असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे.

यंदा  5 सोमवार येणार

हिंन्दू पंचांगातील पवित्र श्रावण महिना 9 ऑगस्टपासून होणार आहे. श्रावण महिना भगवान शंकराला खूप प्रिय समजला जातो. या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार येणार आहेत. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केल्याने भाविकांना अपेक्षित फळ मिळते अशी मान्यता आहे. 9 ऑगस्ट रोजीच श्रावणातील पहिला सोमवार आहे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास भाविकांना अपेक्षित फळ प्राप्त होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt