भुसावळात शाळकरी विद्यार्थिनीवर अतिप्रसंग ; आरोपी शिक्षकाला पाच वर्ष शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरातील शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षकास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तौसूफुद्दीन फरीदउद्दीन असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडीतेसह तपासाधिकार्‍यांची साक्ष ठरली महत्वाची

नगरपालिका शाळेतील प्राथमिक शिक्षक असलेल्या आरोपी तौसूफुद्दीन फरीदउद्दीन याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आरोपी विरोधात पीडीतेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

त्यात पीडीतेसह फिर्यादी तसेच तपासाधिकारी आर.एम.वसतकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्या.आर.एम.जाधव यांनी भादंवि 354 प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड तसेच पोस्को कलमाप्रमाणे पाच वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे (जळगाव) तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सहा.फौजदार समीना तडवी यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज