रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पहूर येथील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१। पहूर ( ता. जामनेर ) येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्ता आडवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अक्षय अर्जून मोरे (वय-२०) असे विनयभंग केलेल्या व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की,  शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियासह राहते. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास मुलगी सायकलेने घरी जात असतांना गावातील अक्षय अर्जून मोरे (वय-२०) याने रस्ता आडवून मुलीचा विनयभंग केला. पोलीसात गेला तर मुले जमा करून मारहाण करेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी पिडीत मुलीने संशयित आरोपी अक्षय मोरे यांच्या विरोधात तक्रार दिली. मुलीच्या तक्रारीवरून पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय बनसोड करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज