सावखेडात विवाहितेचा विनयभंग; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । सावखेडा ( ता.पाचोरा ) येथे २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील २१ वर्षीय महिला ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास महिला घरात असतांना गावातील साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनिता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांनी महिलेचा घरात येवून महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून चौघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी साईनाथ शिवाजी गोपाळ, नवनाथ शिवाजी गोपाळ, सुनिता साईनाथ गोपाळ आणि सोनाली नवनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय माळी करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -