fbpx

मोहरमची सुटी २० रोजी जाहीर करावी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । मुस्लिम बांधवांचे सर्व सण, उत्सव व महत्वपूर्ण दिवस हे चांद रात (चंद्रदर्शन) झाल्यावरच किंवा चांद की शहादत (चंद्रदर्शन झाल्याची साक्ष) मिळाल्यावरच साजरे केले जातात. यौमे आशूरा हे १९ ऑगस्ट ऐवजी २० ऑगस्ट रोजी साजरे होणार असल्याने मोहरमची सुट्टी २० रोजी मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मुस्लिम बांधवांचे पवित्र सण व नूतन वर्ष मोहरमची चांद रात कॅलेंडरमध्ये ९ ऑगस्ट होती. त्यानुसार मोहरमचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस यौमे आशूरा हा १९ ऑगस्टला दाखविला आहे. परंतु ९ ऑगस्टला चंद्रदर्शन न झाल्यामुळे तसेच १० ऑगस्टला सर्वत्र चंद्रदर्शन झाल्यामुळे १० ऑगस्टला मोहरमची एक दिनांक असल्यामुळे यौमे आशूरा हे १९ ऑगस्ट ऐवजी २० ऑगस्ट शुक्रवारी साजरे होणार आहे. मोहरमची शासकीय सार्वजनिक सुटी १९ ऐवजी २० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात यावी. कारण यौमे आशूरा हा मुस्लिम बांधवांचा फार मोठा सण असल्यामुळे या दिवशी मुस्लिम बांधवांतर्फे नमाज ए आशूरा, दुवा ए आशूरा व विविध धार्मिक विधी, कार्यक्रमांचे करण्यात येते.
मरकज सुन्नी जामा मस्जिद जळगाव तसेच सून्नी रुयते हिलाल कमिटी जळगावतर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे निवेदन पाठवून मोहरमची सुटी १९ ऐवजी २० तारखेला जाहीर करून मुस्लिम बांधवांची होणारी मोठी गैरसोय काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी सै.अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, अहमद खान, शेख शफी, शेख नूर मुहम्मद, रफिक कुरेशी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज