fbpx

खडसेंचे कट्टर समर्थक मोहंमद हुसेन यांचे निधन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ ।  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहंमद हुसेन उर्फ आमीर यांचे आज शनिवारी दुपारी निधन झाले.

मोहंमद हुसेन उर्फ आमीर हे गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथरा खडसे यांचे अतिशय जवळचे समर्थक म्हणून गणले जात होते. त्यांनी काही काळ राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज