fbpx

घ्या….आता तर चक्क महिला पोलीस उपनिरीक्षकाचाच मोबाईल चोरट्याने लांबविला

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । जळगाव शहरात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. आता तर चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याचाच मोबाईल लांबविल्याचा प्रकार घडला आहे.

शहरातील गोलाणी मार्केट मधील डिलाईट शॉप जवळ महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता गबरू राठोड यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, योगिता राठोड या जळगाव जिल्हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. काल रविवार २५ जुलै रोजी दुपारी १२.१५ ते १२.३० वाजेच्या दरम्यान शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील डिलाईट शॉप समोरील रोडच्या बाजूला मुलाचा वाढदिवसानिमित्त केक घेण्यासाठी कुटुंबियांसह आलेल्या होत्या. . त्याच्या चारचाकी वाहनात १७ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा महागडा मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आल.

आजूबाजूला परिसरात शोधाशोध केली, परंतू मोबाईल आढळला नाही. रविवारी रात्री १० वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज