गोलाणी मार्केटमधील दुकानातून लांबविला मोबाईल

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । दुकानातील कर्मचारी ग्राहकांना मोबाईल दाखविण्यात व्यस्त असल्याची संधी साधत एका अज्ञात इसमाने मोबाईल लांबविल्याची घटना गुरुवार दि.११ रोजी शहरातील गोलाणी मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी दुकान मालकाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रोहन पाटील यांच्या मालकीचे जी.व्ही. इंटरप्राइजेस नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शाहिद देशमुख हे कामाला असून ते दुकानात आलेल्या ग्राहकांना मोबाईल दाखवीत होते. कर्मचारी मोबाईल दाखविण्यात व्यस्त असल्याची संधी साधत दुकानात आलेल्या एका अज्ञात इसमाने ओप्पो कंपनीचा मोबाईल लंपास केला. याप्रकरणी दुकान मालक रोहन पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेचे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज