fbpx

मनसेच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक के.के. पाटलांचे अभिनंदन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला नुकतेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक के.के.पाटील उर्फ कांतीलाल पाटील यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाळीसगाव शहरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मनसे अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

विभागीय पोलीस आयुक्तांनी नुकतेच पोलीस दलातील बदल्यांचे पत्रक जारी केले होते त्यानुसार चाळीसगाव शहराचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांची जळगावला तर चाळीसगाव शहरासाठी कांतीलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख अण्णा विसपुते यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य तुषार देशमुख, दीपक पवार, दीपक चौधरी, पंकज स्वार, गोविंदा गांगुर्डे, तात्या चौधरी यांच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक के के पाटील यांचे पोलीस स्टेशन येथे जाऊन अभिनंदन करण्यात आले.

नूतन पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी मोकळा संवाद साधला व राजकारण या व्यतिरिक्त आपण काय काम करतात अशीदेखील विचारपूस सर्वांना केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज