बनावट कीटकनाशक प्रकरणी मनसेची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ ।  दहिवद येथे शेतकऱ्यांना बनावट बायो ३०३चे कीटकनाशक विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला असून याबाबत सखेाल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास चिंचगव्हाण चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,  कृषी केंद्रावरून शेतकऱ्यांना बायो 303 या कंपनीचे बनावट किटकनाशक देण्यात आले. यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादीही कृषी विभागाला निवेदनासोबत दिली आहे.
या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून पुढील सात दिवसात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाळीसगाव-धुळे महामार्गावर चिंचगव्हाण चौफुलीवर १० सप्टेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -