fbpx

गारबर्डी धरण पूर्ण भरले, आ.शिरिष चौधरींच्या हस्ते जलपूजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण पूर्ण भरले असून मंगळवारी आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

रावेर-यावल तालुक्याची जलदायिनी सुकी नदी आहे. या नदीवरील गारबर्डी धरण पूर्ण भरुन वाहत आहे असून त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. यानिमित्ताने सुकी धरणावर सुकी नदीचे जलपुजन आमदार शिरिष चौधरी यांच्यासह परिसरात सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शेतकरी यांनी केले.

त्याप्रसंगी जि.प. सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, लिलाधर चौधरी, युवानेते धनंजय चौधरी, पं.स.सदस्य योगेश पाटील, सर्फराज तडवी, हमीद तडवी, रमेश महाजन, विजय महाजन, तुकाराम बोरोले, किशोर चौधरी, गुणवंत टोंगळे, मुरलीधर राणे, लियाकत जमादार, संजय जमादार, जावेद जनाब, जिया, देविदास हडपे, संजय चौधरी, सुधाकर झोपे, जितेंद्र पाटील, दिपक धांडे, कामिल शेठ, पिंटू पवार, चंद्रकांत भंगाळे, अनिल लढे, सुनील फिरके, सुनील कोंडे, डॉ.राजेंद्र पाटील, सरपंच योगेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संतोष महाजन, गंभीर तडवी, आर.के.चौधरी, भरत कुवर, संतोष नवले, योगेश सैतवाल व परिसरातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज