जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि. जळगाव (ग.स.सोसायटी) या संस्थेला आमदार सत्यजित तांबे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेतर्फे आमदार तांबे यांचा सत्कार सहकार गटचे नेते व्हि.झेड पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन केला.
संस्थेची आर्थिक प्रगती व ऑनलाईन कामकाज पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी संचालक मंडळास व संस्थेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अजबसिंग पाटील, उपाध्यक्ष अमरसिंग पवार, संचालक महेश पाटील, अजयराव सोमवंशी विजय पवार. मनोज माळी, योगेश इंगळे, सौ. राागिणी चव्हाण, विजय पाटील व व्यवस्थापक वाल्मीक पाटील, लेखापाल प्रदिप पाटील तसेच संस्थेचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.