आ.राजूमामा भोळे होम क्वारंटाईन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी देखील कोरोना चाचणी केली आहे. सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असला तरी ते काही दिवस होम क्वारंटाईन होत आहे. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल दि.८ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला होता. गुरुवार आणि शुक्रवारी आ.महाजन हे पक्षाच्या बैठकीला आणि विविध कार्यक्रमांना हजर असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आ.महाजन यांनी केले होते. आ.राजूमामा भोळे यांनी देखील कोरोना चाचणी केली असता सुदैवाने त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून आ.सुरेश भोळे हे काही दिवस होम क्वारंटाइन होत आहे. या दोन-तीन दिवसात असलेल्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहू शकणार नसल्याने त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच नागरिकांना काहीही काम असल्यास मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -