fbpx

बंजारा तांड्याच्या प्रश्नांसंदर्भात आ.मंगेश चव्हाणांनी घेतली ग्रामविकासमंत्र्यांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालुक्यातील बंजारा तांड्यांच्या संदर्भातील विविध विषयांच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री मा.हसनजी मुश्रीफ यांची आमदर मंगेश चव्हाण यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली.

चिंचगव्हाण मधून सुंदरनगर, लोंजे मधून आंबेहोळ, तळेगाव मधून कृष्णानगर तांड्यांचे विभाजन करून नवीन ग्रामपंचायत निर्माण करणे. व राष्ट्रीय महामार्ग २११ ते चैतन्य तांडा गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयाकडून आलेल्या पत्राचा प्रस्तावा बाबत कार्यवाही करणे, चाळीसगाव तालुक्यातील नवीन निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीना ग्रामसेवक पद (सजा) निर्माण करून पदभरती करणे, स्व.बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालयांना इमारत मंजूर होणे. आदी संदर्भात पत्राच्या माध्यमातून मागणी केली. व सविस्तर चर्चा देखील केली.

यावेळी तळेगावचे सरपंच संतोष राठोड, चिंचगव्हाण चे सरपंच सुभाष राठोड, लोंजेचे माजी उपसरपंच बळीराम चव्हाण, चैतन्य तांडाचे सरपंच पती व भाजपा विजाभज आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज