fbpx

आंदोलन केल्याप्रकरणी आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । वीज परिमंडळ कार्यालयात अधिक्षक अभियंत्याला खुर्चीला दोरीने बांधून आंदोलन केल्याच्या प्रकरणात अटक असलेले चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ संशयितांना आज न्यायालयात हजर केले असता सर्वांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शुक्रवारी वीज वितरणच्या जळगाव एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात धडक दिली. यावेळी आक्रमक होत आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदारांसह संतप्त शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता शेख यांना दोरीने खुर्चीला बांधले व त्याच अवस्थेत केबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले. वेळीच एमआयडीसी पोलिसांनी हस्तक्षेप करत अधीक्षक अभियंता शेख यांची सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, आज दुपारी मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ संशयितांना न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रसंगी न्यायालयाने आमदार चव्हाण यांच्यासह इतरांना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज