आमदार मंगेश चव्हाण कुटुंबांना घरे उभारून देणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ सप्टेंबर २०२१ | टेन्शन लेऊ नको माय हाऊ तुना पोरगा शे तुना पोरगा तुले घर बांधी दि.. अशा शब्दात आमदार मंगेश चव्हाण हे नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत तितुर नदीला आलेल्या महापुराने अनेक गावांमध्ये नागरिकांचे सर्वस्व हिरावून नेले आहे.

या गावांमधील नुकसानीची गेल्या दोन दिवसापासून आमदार मंगेश चव्हाण व त्यांचे सहकारी पाहणी करीत आहेत या पाहणीत महापुराने सर्व ओरबाडून नेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. दादा सगळं काही गय दोन पैसा देत त्या बकऱ्या हि नदीमा वाही गयात. आते आम्ही कुठे जाऊ अशी भावना बाणगाव येथे वृद्धेने मांडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी वृद्ध दाम्पत्याला जवळ घेत बाबा सगळ जरी वाही गय तरी आपलं नशीब थोडी कोणी लई गय..? परत उभा राहूत काळजी करू नको हा तुला पोरगा शे अशा अहिराणीत संवाद साधत आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना धीर दिला.

 

शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल पण तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मदत म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील 50 गरजू कुटुंबांना निवाऱ्यासाठी येत्या आठ दिवसात स्टील पत्र्याची घरे उभारून उभी करून देणार असल्याचा निर्णय आमदार मंगेश चव्हाण यांनी जाहीर केला. तसेच या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य कपडेदेखील उपलब्ध करून देणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar