आ.गिरीश महाजनांचा पुनरोच्चार, सुनील झंवर सर्वांचेच निकटवर्तीय

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी मुख्य संशयीत सुनील झंवर यांना अटक झाली आहे. सुनील झंवर यांना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. सुनील झंवर हे जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय असल्याचा पुनरोच्चार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केला आहे.

बीएचआर पतसंस्थेप्रकरणी अनेक दिग्गज अडचणीत आले असून बहुतांश जणांना अटक झाली आहे. बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयीत सुनील झंवर याला नुकतेच अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यात सुनील झंवर याचे नाव आल्यानंतर ते माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचेही नाव जोडले जात होते. तेव्हा आ.महाजन यांना विचारणा केली असता झंवर सर्वांचेच निकटवर्तीय असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. शुक्रवारी आ.महाजन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना पुन्हा सुनील झंवरबाबत विचारणा केली. आ.महाजन म्हणाले की, झंवर यांना अटक झाली असून तपास यंत्रणा पुढील तपास करीत आहे. त्यातून जे निष्पन्न व्हायचे ते होईल. सुनील झंवर सर्वांचे निकटवर्तीय असून प्रत्येकाचे त्याच्याशी संबंध आहे. सर्वच पक्षातील लोकांशी त्यांचे संबंध आहेत. कुणी नाही म्हणावे त्यांचे माझ्याशी संबंध नाही, असे आ.महाजन म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar