जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते आनंदा चौधरी व चिंतामण पाटील या दोघांचा देखील गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तेली समाजाचे पदाधिकारी आनंदा चौधरी, चिंतामण पाटील, युवासेना प्रमुख बबलु पाटील, शरद ठाकुर,कुणाल पाटील,राज पाटील,मुकुंदा पाटील,कृष्णा ओतारी,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा.सुधीर शिरसाठ,शहराध्यक्ष कैलास महाजन,नितीन ठक्कर,कुंदन ठाकुर, आबा महाजन, उमेश महाजन, पंकज महाजन, शैलेश चौधरी आदी उपस्थित होते.

एरंडोल-पारोळाच्या विकासासाठी निधी आणण्याची ग्वाही
नगर पालिकेत आमची सत्ता नसताना चार कोटीची कामे दिली,आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये जर आम्हाला मतदारांनी सत्ता सोपवली तर तीनशे कोटींपेक्षा अधिक निधी आम्ही एरंडोल-पारोळा शहरांच्या विकासासाठी आणू अशी ग्वाही आ. चिमणराव पाटील यांनी यावेळी दिली. सरकार रूपी महासागरात डुबकी मारून जो हीरे-मोती काढुन आणतो तोच खरा लोकप्रतीनिधी असतो, संस्था लोकांच्या विकासासाठी स्थापन झालेल्या असतात त्या माध्यमांतुन जर चांगली कामे होत नसतील तर त्या काही कामाच्या नाहीत. एरंडोल शहराच्या हद्दवाढीचे काम आम्ही मार्गी लावले, वाढीव क्षेत्रासाठी मंजूर निधीपैकी अजूनही विस कोटी निधी पडून आहे, असा दावा देखील आमदार चिमणराव पाटील यांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज