fbpx

अल्पवयीन बेपत्ता तरुणीचा मध्यप्रदेशात लागला शोध

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । अमळनेर पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय मुलीचा शोध लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध लावला आहे. 4 ते 5 डिसेंबर 2020 अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मध्यप्रदेशात आढळली तरुणी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय विजय पाटील, नरेंद्र वारुळे, संदीप साळवे तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे गंभीर शिंदे, कैलास शिन्दे, योगेश महाजन यांच्या पथकाने मंगरूळ, धुळे, नंदूरबार, उधणा(गुजरात), साईखेडी (मध्यप्रदेश) या ठिकाणी मुलीचा शोध घेतला असता 31 मे रोजी बेपत्ता 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी साईखेडी ( ध्यप्रदेश) येथे नातेवाईकांकडे आढळल्याने तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt