fbpx

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवत फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव न्यायालयाने शुक्रवारी १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील विजय निंबा ठाकरे वय-२१ याने गावातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी दि.१० जून २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीचे जबाब देखील घेण्यात आले होते. या जबाबावरून गुन्ह्यात पोस्को अंतर्गत कलम वाढविण्यात येऊन जळगाव न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.डी.एन.खडसे यांच्या न्यायालयात याप्रकरणी कामकाज झाले. सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून पळवून अत्याचार केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा तसेच पोक्सो कलमनुसार १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी न्यायालयाने सुनावली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज