मंत्रालयातून २४ काेटींची कामे थांबवण्याचे आदेश

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । जिल्हा परिषदेच्या असमान निधी वाटपाची चाैकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून ही चाैकशी हाेईपर्यंत सर्व कामांना स्थगिती देण्याचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडून काढण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत शासनाचा निधी आपसात वाटप करून अन्य सदस्यांवर अन्याय केलेल्या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेतली आहे या आदेशामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद सदस्या प्रा. डाॅ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यामातून जिल्हा परिषदेतील असमान निधी वाटपाचा विषय थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सांगितला हाेता. जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी काही गटनेते व सदस्यांना सोबत घेवून अवघ्या १४ ते १५ जणांच्या गटात २३ ते २४ कोटीचे नियोजन परस्पर करुन मान्यता घेतल्या आहे. याबाबत प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या २४ कोटींच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने ७ जानेवारी रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागाने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र स्थगिती टळल्याने प्रशासनाने फक्त अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू केली होती

जिल्हा परिषदेतील निधीचे नियाेजन करतांना सत्ताधाऱ्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी हातमिळवणी करीत अधिकाऱ्यांनी निधीचे असमान वाटप केले आहे. निधी वाटपामध्ये भाैगाेलिक दृष्ट्या असमानता दिसत असल्याने जलसंधारण आणि बांधकाम विभागाची कामे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा:

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -