fbpx

पोस्ट ऑफिससमोर दूध बूथ फोडले, रोकड लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर रस्त्यालगत असलेले विकास दूध बुथ चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला आहे. चोरट्यांनी ८ हजारांची रोकड लंपास केली आहे.

जळगाव शहरातील धांडे नगरात राहणारे जितेंद्र नारायण प्रजापत यांचे विकास दूध बुथ मुख्य पोस्ट ऑफिससमोर आहे. गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते दुकान बंद करून ते नेहमीप्रमाणे घरी गेले. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता दरवाज्याचे दोन्ही कुलूप तुटलेले त्यांना दिसून आले.

चोरट्यांनी दुकानातून ड्रॉवर फोडून ७ ते ८ हजारांची रोकड लंपास केली आहे. जितेंद्र प्रजापत यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. मुख्य रस्त्यावर आणि वर्दळीच्या परिसरात असलेले दुकान फोडल्याने पोलिसांचा धाक संपला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात देखील शनीपेठ पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले एक दुकान फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती मात्र याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज