fbpx

व्यापार्‍यास जंगलात मारहाण करून लुटले ; हलखेड्याच्या आरोपीला अटक

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने भाईंदरच्या व्यापार्‍याला लुटल्याप्रकरणी हकीम पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयीताच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. भाईंदर येथील व्यापारी संदीप वाणीगेाटा यांच्यासह त्यांच्या साडूला लूटल्याप्रकरणी बाजारपेठ पेालिसांनी हलखेडा येथील हकीम शरीफ पवार या संशयीताला अटक केली.

कंपनीतील स्क्रॅप माल खरेदी करण्यासाठी मुंबई भाईंदर येथील संदीप वाणीगोटा व त्यांचे साडू दिनेशकुमार जैन हे 14 ऑगस्टला आल्यानंतर त्यांना मुक्ताईनगर येथील कुर्‍हा काकोडाच्या जंगलात नेण्यात आल्यानंतर संशयीतांनी त्यांना मारहाण केली होती व त्यांच्याकडील सुमारे तीन लाख रूपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता.

दरम्यान, तक्रारदार वाणीगोटा व त्यांचे साडू यांना बोलावून ओळखपरेड होणार असल्याचे तपासाधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज