धर्मादाय रुग्णालयांच्या फलकावर ‘धर्मादाय ‘ उल्लेख करा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर धर्मादाय असा उल्लेख करावा, तसेच गरीब आणि गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावावे, अशी मागणी आरोग्य सहायक समितीतर्फे साहायक धर्मादाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावामध्ये अथवा नावासमोर ‘धर्मादाय अथवा चॅरिटेबल’ हा शब्द नमूद करण्यास, तसेच प्रसिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आरोग्य सहायक समितीने जळगाव जिल्ह्यासह रुग्णालयांमध्ये इतर या शहरातील आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच जिल्ह्यातील काही धर्मादाय रुग्णालयांनी गरीब आणि गरजू रुग्णांसाठी शासनाकडून वेळोवेळी लागू केलेल्या विविध योजनांची माहिती देणारे फलक, आरोग्य सुविधा आदी प्रसिद्धी फलक लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar