यावल येथे स्व.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । या देशात आजपर्यंत समाजातुन दुर्लक्षीत राहीलेला जर कोणता वर्ग असेल तर तो वृत्तपत्र विक्रेता असुन आपला देश हा जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र घरोघरी पोहचविणारा वृत्तपत्र विक्रेता आहे. देशाचे राष्ट्रपती स्व. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाच्या दिवसी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा होण आपण सर्वांसाठी गौरवाची बाब आहे असे मनोगत यावल येथे संपन्न झालेल्या पहील्याच वृत्तपत्र विक्रेता संघटने बैठकीत कुशाल पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान आज दिनांक १५ ऑक्टोबर रोजी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक देशाचे राष्ट्रपती स्व .डॉ .ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दिपप्रज्वलन करून राष्ट्रपती डॉ .ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभीवादन करण्यात आले.

यावेळी बोलतांना विक्रत्यांनी आपले मत व्यक्त करतांना राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्या बद्दल माहीती देतांना सांगीतले की देशाच्या सर्वोच्चपद राष्ट्रपती या पदावर विराजमान झालेले डॉ. अब्दुल कलाम यांनी सुद्धा लहानपणी वृत्तपत्र विक्री करून प्रगतीची शिखर गाठलीत . यावल येथे संपन्न झालेल्या या महाराष्ट्र राज्य वृत्तविक्रेता संघाचे बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली . या बैठकीस विभागीय कार्याध्यक्ष जिवन चौधरी, सहसचिव नितिन बाणाईत, जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश वाणी, राजेन्द्र देशमुख , प्रकाश नेहते, पांडुरंग बारी, मुकुंदा भार्गव, तुषार साळुंखे, सुधाकर गडे, अजय गडे, भगवान पाटील, मोहीत बाउस्कर, खुशाल पाटील आदी वृत्तपत्र विक्रेते उपास्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज