यावल येथे वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । देशात आजपर्यंत समाजातुन दुर्लक्षीत राहीलेला जर कोणता वर्ग असेल तर तो वृत्तपत्र विक्रेता आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र घरोघरी पोहचविणारा वृत्तपत्र विक्रेता आहे. देशाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाच्या दिवसी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा होणं सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, असे मत कुशाल पाटील यांनी व्यक्त केले.

देशाचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे दि.१५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस दिपप्रज्वलन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहीती देतांना, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेले डॉ. अब्दुल कलाम यांनी सुद्धा लहानपणी वृत्तपत्र विक्री करून प्रगतीचे शिखर गाठल्याचे सांगीतले.

बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या व अडचणीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीस विभागीय कार्याध्यक्ष जिवन चौधरी, सहसचिव नितिन बाणाईत, जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश वाणी, राजेंद्र देशमुख, प्रकाश नेहते, पांडुरंग बारी, मुकुंदा भार्गव, तुषार साळुंखे, सुधाकर गडे, अजय गडे, भगवान पाटील, मोहीत बाउस्कर, खुशाल पाटील आदी वृत्तपत्र विक्रेते उपास्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज