fbpx

शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. प्रशांत देवरे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. प्रशांत देवरे यांची नियुक्ती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केली. यासह दोन उपवैद्यकीय अधीक्षक, दोन विशेष कार्याधिकारी यांची देखील नियुक्ती त्यांनी केली.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाने चांगलच कहर केला असून बाधित रुग्णांच्या संख्येसह मृताच्या वाढत्या आकड्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर ताण पडत आहे. दरम्यान, कामकाजात सुटसुटीतपणा येण्यासांठी हे बदल केले आहेत. शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांची नियुक्तीचे आदेश काढण्यात आले असून डॉ. देवरे यांच्यासह नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार घेतला आहे. 

त्यांच्यासह शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. संगीता गावित व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विलास मालकर यांची उप वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली आहे. तसेच विशेष कार्याधिकारी म्हणून दंत शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण व डॉ. सतीश सुरळकर यांची देखील नियुक्ती अधिष्ठाता यांनी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज