fbpx

पारोळ्यात मेडिकल फोडले, हजारोंची रोकड लंपास

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । पारोळा शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले मेडिकल स्टोअर फोडत चोरट्याने ५६ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना दि.१८ च्या मध्यरात्री घडली.

अमळनेर येथील एकनाथ भगवान देसले यांच्या मालकीचे मेडिकल पारोळा येथील मुख्य बाजारपेठेत आहे. नेहमीप्रमाणे दि.१८ रोजी हिशोब करून आलेली रोकड त्यांनी दुकानाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून सव्वानऊ वाजता दुकान बंद करून नेहमीप्रमाणे ते घरी गेले होते. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील ५६ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याबाबत गुरुवारी त्यांनी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज