महापौर जयश्री महाजन यांचा जिल्हा बँकेतील अर्ज मान्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जळगाव मतदार संघातून महापौर जयश्री महाजन यांनी देखील अर्ज भरला आहे. महापौरांच्या अर्जावर काल हरकत घेण्यात आली होती मात्र तपासणीनंतर तो अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे.

जळगाव मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव विकास सोसायटी मतदार संघातून जिल्हा बँकेत अर्ज दाखल केला आहे. महापौरांच्या अर्जावर चंद्रकांत संतोष पाटील यांच्यासह काही जणांनी हरकत घेतली होती. चंद्रकांत त्र्यंबक पाटील यांनी हरकती संदर्भात पुरेसे कागदपत्र सादर न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी हरकत फेटाळून लावली आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत महापौर जयश्री महाजन यांचा अर्ज मान्य करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज