‘जळगाव लाईव्ह’च्या रिऍलिटी चेकमुळे कळल्या समस्या : महापौर जयश्री महाजन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । जळगाव लाईव्ह सुरू होऊन अवघे सात महिने झाले आहेत जळगाव लाईव्हने सुरू केलेल्या रियालिटी चेक उपक्रमातून त्यांनी प्रत्येक प्रभागाचा दौरा केला. या उपक्रमामुळे आम्हाला कुठल्या प्रभागात कुठल्या महत्त्वाच्या समस्या आहेत हे सहजपणे कळले, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले. तसेच
जळगाव लाईव्हच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

जळगाव लाईव्हने महापौरांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, जळगाव नवीन योजना अल्पावधीतच मोठा टप्पा गाठला आहे.

जळगाव लाईव्हचे नवनवीन फंडे आणि उपक्रम खरोखरच खूप कौतुकास्पद असतात. जळगाव शहरात प्रत्येक प्रभागात फिरून, नागरिकांशी चर्चा करून जळगाव लाईव्हने समस्या जाणून घेतल्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवल्या.

एका जागी बसून आम्हाला सर्व समस्या माहिती झाल्या, असे महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. तसेच जळगाव लाईव्हच्या सर्व उपक्रमांना आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -