fbpx

शिवसेनेतील अंतर्गत कलह ; महाजन-खडसे भेट आज दुपारी होणार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ । शहरातील शिवसेनेचा अंतर्गत कलह चांगला चव्हाट्यावर आला असून भाजपातून शिवसेनेत दाखल झालेल्या नगरसेवकांना पक्षातूनच अडचणी निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरपणे कुणीही बोलत नसले तरी अंतर्गत कलह मोठा वाढला आहे. सर्व घडामोडीत महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट येणार असल्याचे वृत्त ‘जळगाव लाईव्ह न्युज’ने मंगळवारी दिले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव शहर शिवसेनेतील अंतर्गत कलह पेटला असून गटबाजी निर्माण झाली आहे. शिवसेना कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या मुद्द्यावरून पदाधिकारी व कार्यकर्ते अशी दुफळी दिसून आली होती. शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर सर्वांच्या एकमताने विकासगंगा येणार अशी आशा होती मात्र आताच गटबाजी होत असल्याने पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या महिन्यात मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेत मनपातील कुंडली मांडली होती.

खडसे आणि महाजन यांची महिन्याभरानंतर पुन्हा भेट होणार असल्याचे वृत्त मंगळवारी जळगाव लाईव्ह न्यूजने दिले होते. बुधवारी दुपारी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे जळगावात पोहचणार असून ३ वाजता महाजन-खडसे भेट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भेटीत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज