fbpx

महापौर, उपमहापौरांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  शहर मनपावर शिवसेनेचा प्रथम महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या तेव्हा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे कोरोना संसर्गाने विलगीकरणात होते. कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात दाखल झाले असून महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊ सत्कार केला.

राज्यात महाआघाडी सरकार असून पालकमंत्री नात्याने आपण जळगाव शहराच्या विकासासाठी काय करू शकतो. भविष्यात विकासकामांचे आणि निधीसाठी कसे नियोजन करता येईल याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt