fbpx

नूतन महापौर – उपमहापौर यांनी स्वीकारला पदभार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । नवनिर्वाचीत महापौर सौ. जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज सतराव्या मजल्यावरील कार्यालयात आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला. यावेळी जय भवानी…जय शिवाजी या घोषणांच्या गजरासह फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. 

जळगाव महापालिकेवर शिवसेनेने भगवा फडकला आहे. भाजपचा धुव्वा उडवत शिवसेनेने महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवडून आणले आहे. इतकेच नाही तर शिवसेनेने उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनाही निवडून आणले आहे.  शिवसेनेला या निवडणुकीमध्ये भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी मदत केली. ज्यामुळे शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.  या निवडणुकीमध्ये भाजपचे 27 नगरसेवक फुटले.

दरम्यान, आज महापौर आणि उपमहापौर यांनी आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला. यावेळी दोघांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. या दोन्ही मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आरती केली. यानंतर सतराव्या मजल्यावर दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदांचा कार्यभार सांभाळण्याआधीच शिवसैनिकांनी परिसरात जय्यत तयारी करून ठेवली होती. काल सायंकाळपासूनच परिसर भगव्या रंगात रंगल्याचे दिसून आले. या भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि नूतन महापौर व उपमहापौरांच्या स्वागतांचे फलक दिसून आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज