शासकीय, खासगी कार्यलयांनाही मास्क बंधनकारक 

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, औद्याेगिक आस्थापनांत मास्कचा वापर करणे सक्तीचे आहे. असे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी २६ ऑक्टोबर राेजी आदेश काढले आहेत. ज्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचनाही दिल्या असून, या संदर्भात सर्व कार्यालयांना शासन आदेश पाठवण्यात आले आहेत.

सविस्तर असे की, काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला राेखण्यासाठी शासनाने ब्रेक दो शेन अंतर्गत राज्यात लसीकरण, शारिरिक अंतर आणि मास्क वापरणे आवश्यक आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाेबतच सर्वच कार्यालयांत मास्कचा वापर करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी २६ ऑक्टोबर राेजी आदेश काढले आहेत.

सर्वच शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी यांना मास्कचा वापर करणे सक्तीचे केले आहे. ज्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मास्कचा वापर करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. संबंधित कार्यालयातील विभाग प्रमुख हे दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहतील. दंडाची जमा रक्कम महसुली जमा खात्यात भरावी लागणार आहे. या संदर्भात सर्व कार्यालयांना शासन आदेश पाठवण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज