fbpx

पतीसह सासरकडील मंडळीला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील 31 वर्षीय विवाहितेने पतीसह सासरकडील मंडळीला  कंटाळून धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. माधुरी राजेंद्र जाधव असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पतीसह सासरकडील मंडळीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, तालुक्यातील आव्हाने येथील राजेंद्र दिलीप जाधव यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रामचंद्र वामन पवार यांची दुसरी कन्या माधुरी यांच्याशी 2007 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.  दरम्यान पत्नीला दोन मुली झाल्या व मुलगा झाला नाही तसेच घरातील विविध कारणांवरून विवाहिता माधुरी हिच्या सासरच्या मंडळींसह पतीने  तिला बळजबरीने माहेरी सोडून देणे पुन्हा घरात न घेणे तसेच मुलींना भेटू न देणे अशा प्रकारचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेल्या होत्या. 

दरम्यान काल बुधवारी २३ जून २०२१ रोजी माधरीला दोन्ही मुलींची आठवण होत असल्यामुळे जळगावला आली होती. त्यानंतर त्या आव्हाणे येथील सासरी गेली असताना माधुरीला घरातून हाकलून दिले व मुलींना भेटूही दिले नाही. दरम्यान, आज सकाळी माधुरी धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.  दरम्यान पती व सासरच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज