fbpx

वरणगावला विवाहितेचा आत्महत्या, घातपात झाल्याचा संशय

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ ।  वरणगाव येथे एका २१ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. रुकसारबी शाहरुख खान (वय २२  रा. अक्सा नगर, वरणगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विवाहितेचा पती, सासू आणि दीर या तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत असे की,  सावदा येथील माहेर असलेल्या रुकसारबी खान हिचे दोन वर्षांपूर्वी शाहरुख याच्याशी लग्न झाले होते. दरम्यान, आज शनिवारी सकाळी रुकसारबी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.  दरम्यान, रुकसारबी हीला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने  जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मयत विवाहितेचे शवविच्छेदन करण्यात आले.

पती शाहरुख उस्मान खान, दीर मुश्तकीन खान आणि सासू जोहराबी खान, सासरा उस्मान खान, ननंद नाजमिनबी जहिर खान हे तिचा शुल्लक कारणावरून तसेच ती त्यांना पसंद नसल्याचे कारणावरून वेळोवेळी तिचा शारीरीक व मानसिक रित्या छळ करून व तीला क्रूर वागणूक देत असल्यामुळे त्यास कंटाळून तिने गळफास घेवून आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतला असून तीच्या मृत्यूस हे सर्वस्वी जबाबदार असून त्याच्या विरुद्ध मोहम्मद शफी यांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी  वरणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे .

वरील घटनेचा  तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक  संदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील वाणी , पो हे कॉ भूषण माळी, मजहर पठाण, अतुल बोदडे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज