क्रांती ज्योतींच्या जयंतीला सावित्रीच्या लेकीची छळाला कंटाळून आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशीच एका सावित्रीच्या लेकीला सासरच्या छळमुळे आत्महत्या करावी लागण्याची दुर्देवी घटना घडली. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या सासू व पतीच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भुसावळ येथील सुभाषनगर आयुध निर्माणी येथे ही घटना घडली असून मनीषा गौरव तायडे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासूला अटक करण्यात आली.

याबाबत असे की, नीषाचा विवाह सन २०१५-१६ मध्ये झाला. सात महिन्यांचा पहिला मुलगा वारल्यानंतर तिने २६ डिसेंबर २०१७ रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, जुळ्या मुलींना जन्म दिला, आम्हाला या मुली नको. मुलगाच हवा, असे टोमणे वारंवार मारून सासू पुष्पा भीमराव तायडे व पती गौरव भीमराव तायडे यांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला.

या छळाला कंटाळून मनीषाने सोमवारी पहाटे विष प्राशन करुन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील सुनील पोपट तायडे (रा.महादेव टेकडी, कंडारी) यांच्या फिर्यादीवरून सासू पुष्पा तायडे व पती गौरव तायडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, भुसावळ शहरात शवविच्छेदनासाठी महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृत विवाहितेचे जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर कंडारी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -