दिवंगत वडिलांच्या साक्षीने मुलीने लावला विवाह, राज्यात ठरला चर्चेचा विषय..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । एका लेकीचे बापावर, आणि दिवंगत बापाचे आपल्या कुटुंबावर इतके काही प्रेम असू शकते याची आपण कल्पना देखील करणार नाही. याचा उत्‍तम उदाहरण म्हणजे पाचोरा तालुक्यातील सारोळा इथं झालेला एका मुलीचा विवाहसोहळा संपूर्ण जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्यात वधुनं आपल्या दिवंगत वडिलांचा पुतळा समोर ठेवून त्याच्या समक्ष सात फेरे घेतले व वडिलांचे आशिर्वादही घेतले.

याबाबत असे की, नांद्रा (ता. पाचोरा) येथील सेवानिवृत्त जवान भागवत पाटील यांचे कोरोनात निधन झाले. भागवत पाटील यांना चार कन्या होते. दोन मुलींचे लग्न मनासारखे झाले होते. त्‍यानुसारच तिसरी लेक प्रियांकाच्या लग्न देखील करायचे.तिचा सोहळाही मनाप्रमाणे थाटामाटात पार पाडायचा असे त्यांचे ठरले होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

लग्नात वडिलांची कमतरचा भासू नये म्हणून या मुलींनी नाशिकच्या कारागिराकडून स्वत:च्या वडिलांचा सिलिकॉनचा चांदीचा मुलामा दिलेला हुबेहूब पुतळा बनवून घेतला. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. आपले वडील प्रत्यक्ष लग्नाला हजर आहेत, असे मानून त्यांच्यासमोर हळदीपासून ते पाठवणीपर्यंत सर्व कार्यक्रम झाले. वडिलांच्या पुतळ्यासमक्षच प्रियंकाने सात फेरे घेऊन त्यांचे आशीर्वादही घेतले. बापलेकींमधील अनोख्या नात्याचा हा सोहळा अनुभवताना उपस्थितांचे डोळे पाणावले. वऱ्हाडी मंडळींनी प्रियंकांवर कौतुकाचा वर्षाव करत तिला आशिर्वाद दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -