५ लाखासाठी विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । पैशांसाठी विवाहितेवर होत असलेले अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे. अशातच जळगावातील माहेर असलेल्या एका विवाहितेकडून माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा पती व सासू यांच्याकडून छळ केल्याप्रकरणी बुधवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील शनीपेठ परिसरातील योगेश्वर नगरातील विवाहिता पल्लवी प्रदीप चौधरी (वय-३४) यांचा विवाह रावेर तालुक्यातील रोझोदा येथील प्रदीप घनश्याम चौधरी यांच्याशी २००९ मध्ये रितीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती प्रदीप चौधरी याने विवाहितेला लहान लहान गोष्टीवरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर गाडी घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शिवीगाळ व मारहाण केली. यासाठी सासू यांनी देखील पाच लाख रूपयांसाठी तगादा लावला होता.

या छळाला कंटाळून विवाहिता बुधवारी १५ डिसेंबर रेाजी माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या आईवडीलांनी धीर देत शनीपेठ पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती प्रदीप घनश्याम चौधरी आणि सासू मंगलाबाई घनश्याम चौधरी यांच्याविरोधात सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना भावसार करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -