दहा लाखसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव येथे माहेर असलेल्या  एका विवाहितेला फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये सांगत शारीरिक व मानसिक छळपतीसह सासरच्या मंडळींकडून केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, शहरातील शिंदी कॉलणी येथील सोनम विनय दुसाने (वय- ३०) या विवाहितेचा लग्न नाशिक येथील विनय प्रकाश दुसाने यांच्याशी झाला. मात्र सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असे सांगून पती व सासरच्या सदस्यांकडून तिला शारीरिक व मानसिक छळवणूक केली जात. या सगळ्या गोष्टींला कंटाळून सोनम हि आपल्या आईवडिलांकडे (शिंदी कॉलणी चाळीसगाव) येथे येऊन राहायला लागली.

२५ जून २०१९ ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत तिला अमानवी वागणूक दिली गेली. शेवटी या मानसिक त्रासाला कवटाळून सोनम हिने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून पतीसह सासु- सासरे, दिर, मावस सासरे व मावस सासु यांच्या विरुद्ध भादवी कलम- ४९८(अ), ४०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस हवा किशोर सोनवणे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज