दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ३ जणांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । शहरातील एका विवाहितेचा व्यवसायासाठी १० लाख रुपये माहेरहून आणावे, यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. रेखा योगेश मराठे (रा.गणपतीनगर) असे विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या ३ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रेखा यांचा पार्वतीनगर येथील योगेश ऊर्फ गोविंद अरुण मराठे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी रेखा यांनी व्यवसाय करण्यासाठी दहा लाख रुपये आणावेत यावरून पतीसह सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून रेखा मराठे यांनी सोमवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पती योगेश ऊर्फ गोविंद मराठे, सासू विठाबाई अरुण मराठे, जेठ दिगंबर अरुण मराठे (तिघे रा.पार्वतीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास रत्ना मराठे करीत आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -