दहा लाखासाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । माहेरावरुन दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. आणि  अंगावरील दागिने काढून हकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहित महिलेच्या फिऱ्यावरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, माहेरावरुन दहा लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. आणि अंगावरील दागिने काढून हकलून दिल्याप्रकरणी समिक्षा रोहित दरेकर (रा. शिवाजीनगर, मालेगाव, हल्ली मुक्काम कांचननगर जळगाव) या महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन पती रोहित लक्ष्मण दरेकर, सासरे लक्ष्मण आनंदा दरेकर व सासू लता लक्ष्मण दरेकर (सर्व रा. जाजुवाडी, ता. मालेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज