fbpx

1 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ ; तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । प्लॉट घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावेत यासाठी चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू आणि दीर यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मुक्ता सुनील कुंभार (28) हीचे माहेर पातोंडा येथील असून 2017 मध्ये तिचा विवाह अनील चिंतामण जगदाळे राहणार गणेशपुर तालुका चाळीसगाव यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर पती सुनील जगदाळे यांनी बांधकाम सेंट्रींग व्यवसाय व प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावेत यासाठी आपल्याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

तसेच सासू आणि दीर यांनी देखील प्रोत्साहन दिले. सासरच्यांनी केलेला शारीरिक व मानसिक त्रास सहन न झाल्याने विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती सुनिल जगदाळे, सासु शकुंतला चिंतामण जगदाळे, आणि दिर अनील चिंतामण जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक प्रवीण संगीले करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज